Category: आपला सहभाग

आदिवासी पाड्यांत ‘कायदा तुमच्या दारी’; एलएलएम पर्यावरण विभागाच्या विद्यार्थ्यांनी राबविली मोहीम

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या डीएलएलईअंतर्गत एलएलएम पर्यावरण विभागाच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांत कायद्याबाबत जनजागृती केली. महिलांना स्व-संरक्षणाचे धडेही देण्यात आले. यावेळी स्टार चॅरिटीज आणि सुयश फाऊंडेशनही सहभागी झाले...

मूर्ती प्रशिक्षणातून शाडू मातीचा संस्कार रुजविणारे ‘देव’

ठाणे । पर्यावरणस्नेही पिढी निर्माण व्हावी, यासाठी ठाण्यातील देव दाम्पत्य कार्यरत आहेत. त्यासाठीच गणेशोत्सवाच्या आधी ते शाडू मातीने गणेश मूर्ती घडविण्याची कार्यशाळा घेतात. बालवयातच शाडू मातीचे संस्कार रुजल्यास पर्यावरणस्नेही पिढी निर्माण होण्यास मदत होईल...

नदीरक्षक योगेश : कासाडी नदीपात्रातून त्याने काढला 15 गाड्या कचरा, तिवरांचेही करतोय संरक्षण

पनवेल : नदी हा आपल्या जीवनातील मुख्य स्रोतांपैकी एक आहे. पाणी आहे तर जीवन आहे, त्यामुळे नद्या जगवल्या पाहिजेत, या विचाराने झपाटलेल्या योगेश पगडे या 30 वर्षीय तरुणाची ही कहाणी आपल्या सर्वांनाच प्रेरणादायी ठरणारी...

अमेझाॅनचा पेटलेला वणवा विझणार कधी? पृथ्वीची फुफ्फुसे वाचवण्यासाठी एसएफआयची निदर्शने, आगीकडे वेधले लक्ष

औरंगाबाद । पृथ्वीची फुफ्फुसं असलेल्या अमेझॉन जंगलाला लागलेल्या आगीबाबत देशाची आघाडीची विद्यार्थी संघटना असलेल्या स्टुडन्ट फेडरेशन ऑफ इंडियाने(एसएफआय) चिंता व्यक्त केली आहे. आज एसएफआय आणि लोकपर्यावरण मंचने पैठण गेट येथे निदर्शने करत या आगीकडे...

’युनायटेड वे’ मुंबईचे मिशन मॅनग्रूव्हज; जागतिक खारफुटी दिनानिमित्त नेरूळमधील करावे येथे खारफुटींचे वृक्षारोपण

नवी मुंबई : पर्यावरणाचे संरक्षण करणार्‍या खारफुटीच्या झाडांमध्ये वाढ व्हावी, या उद्देशाने युनायटेड वे, मुंबई या संस्थेने मिशन मॆग्रुव्हज नावाचा प्रकल्प सुरू केला आहे. त्यानुसार कांदळवने वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. २६ जुलै ला जागतिक...

पालघरमधील शिरगावात कांदळवन स्वच्छता अभियान; सोनोपंत दांडेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग

पालघर : २६ जुलै हा दिवस जागतिक कांदळवन दिन म्हणून पाळण्यात येतो. या निमित्त विद्यार्थ्यांना कांदळवन किंवा खारफुटीचे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्व समजावे, या उद्देशाने पालघरमधील शिरगावात कांदळवन स्वच्छता अभियान राबविण्यात आली. प्राणीशास्त्र विभाग, सोनोपंत दांडेकर...

मढ समुद्र किनारा प्लास्टीकमुक्त; राबविली स्वच्छता मोहीम

मुंबई, (निसार अली) : समुद्रातून वाहून आलेले प्लास्टीक आणि कचरा यामुळे अस्वच्छ झालेल्या मढ समुद्र किनाऱ्यावर 9 जुलै मंगळवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. किनाऱ्यावर प्लास्टिकच्या कचऱ्याचा खच होता. तसेच कचर्‍यामुळे दुर्गंधी पसरली होती. पर्यटकांनाही...

विद्यार्थ्यांवर पर्यावरण संरक्षणाचे संस्कार करणारे सेंट मॅथिव्ज हायस्कूल; ३०० हून अधिक रोपांची लागवड

मुंबई, (निसार अली) : शालेय जीवनातच विद्यार्थ्यांवर पर्यावरण रक्षणाचे संस्कार व्हावेत, या उद्देशाने मालवणीतील सेंट मॅथिव्ज या शाळेने पर्यावरणस्नेही उपक्रम राबिवले आहेत. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी रोपवाटीका तयार केली आहे. सुमारे ३०० हून अधिक वेगवेगळ्या प्रकारची...

साडेसात फूट मगरीला तरुणांनी धाडसाने पकडले; मानवी वस्तीत घुसत होती

रत्नागिरी, (आरकेजी) : मानवी वस्तीत घुसू पाहणार्‍या साडेसात फ़ुट मगरीला स्थानिक तरुणांनी पकडले आणि वनविभागाच्या ताब्यात दिले.  गुहागर शहरातील वरचापाट भंडारवाडा परिसरातील समुद्रकिनाऱ्यावर ही मगरीला आली होती. समुद्रावर फेरफटका मारत असताना आरेगावातील अनिकेत भोसले,...

दुर्मिळ ऑलिव्ह रिडले कासवांना तरुणांकडून जीवदान

रत्नागिरी, (आरकेजी) :  गुहागरच्या समुद्रकिनारी जाळ्यात अडकलेल्या दोन ऑलिव्ह रिडले कासवांना स्थानिक तरूणांनी जीवदान दिले. किना-यावर सकाळच्या सुमारास फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या वरचापाट येथील काही तरूणांना जाळ्यात काहीतरी अडकल्याचं दिसले. त्यांनी ते जाळं समुद्रातून किनाऱ्यावर खेचत...